मार्च नंतर भाद्यात पुन्हा बाजार गजबजला;भाजीपाल्याची आवक मात्र कमीच
गावची अर्थव्वस्था पुन्हा गतिमान होईल असा सामाजिक कार्यकर्ते राम पाटील यांना विश्वास
{बाबुराव आगलावे}
भादा: मोठ्या कालावधीनंतर लातुर जिल्ह्यातील भादा गावात पुन्हा नव्या जोमाने आज भाजीपाला बाजार भरवला गेला. यात मोठ्या प्रमाणात व्यापा-यांनीही सहभाग नोंदवला होता.
मात्र गेल्या काही दिवसात झालेल्या मोठ्या पावसामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक कमीच होती. नव्याने चालु झालेल्या या बाजारामुळे गावची अर्थव्ववस्था पुन्हा सुरळीत होईल असा विश्वास सामाजीक कार्यकर्ते राम पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी बालाजी शिंदे' अमोल पाटील ' रियाज खोजे ' अतीक बनमे जावेद खोजे ' मधुकर पडुळे पत्रकार बालाजी ऊबाळे यांनी बाजार व्यवस्थीत पार पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
0 Comments