Latest News

6/recent/ticker-posts

मनपाचे आरोग्य पथक पोहोचले जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी

मनपाचे आरोग्य पथक पोहोचले जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी



लातूर:{प्रतिनिधी} राज्यात कोरोनावर नियंत्रणासाठी व राज्य कोरोना मुक्त करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून दिनांक १५ सप्टेंबर २०२० पासून माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते अहमदपूर येथून जिल्हास्तरीय माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. लातूर शहरात लातूर महापालिकेच्या वतीने या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन महापालिकेच्या आरोग्य पथकाकडून कुटुंबातील प्रत्येक सदस्याची आरोग्य तपासणी केली जात असून तसेच कोविड बाबत प्रबोधनही केले जात आहे. आज ह्याच अनुषंगाने महापालिकेच्या आरोग्य पथकातील शेख शमाबी मुजीब(आशा वर्कर), रणदिवे अंजली शिवाजी(आशा सहाय्यक) यांनी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत त्यांच्या पत्नी सौ. सोनम जी. श्रीकांत, मुलगी शाश्वती जी.श्रीकांत यांनी आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन स्वतःची आरोग्य तपासणी करून घेतली.


Post a Comment

0 Comments