Latest News

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस लातूरच्या वतीने तालुक्यातील शिक्षकांना lic slip स्टेटमेंट वाटप कार्यक्रम 

महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस लातूरच्या वतीने तालुक्यातील शिक्षकांना lic slip स्टेटमेंट वाटप कार्यक्रम 



लातूर:{प्रतिनिधी}महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस लातूरच्या वतीने तालुक्यातील शिक्षकांना lic slip/statement चे वाटप पंचायत समिती लातूर येथे केंद्रीय मुख्याध्यापक यांना करण्यात आले.यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शाम गोडभरले,प्रमुख अतिथी म्हणून लातूर पंचायत समितीचे सभापती प्रताप पाटील साहेब, उपसभापती मुन्ना उफाडे, गटशिक्षणाधिकारी फुलारी, एल आय सी चे प्रबंधक महादेव पेदे,एल आयसीचे सल्लागार उमाकांत मुळे, शिक्षक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशवभैय्या गंभीरे राज्य उपाध्यक्ष जे.जे.गायकवाड जिल्हा सरचिटणीस सुरेश सुडे जिल्हा उपाध्यक्ष संजय बिरादार महिला आघाडी उपाध्यक्ष श्रीमती रंजनाताई चव्हाण जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी सर्जे जिल्हा नेते प्रदीपकुमार ढेंकरे लातूर लालुका नेते श्रीहरी रणखांब तालुकाध्यक्ष दत्तात्रय चिवडे सरचिटणीस नरसिंग फेसाटे सर बाभळगाव बीटचे शिक्षणविस्तार अधिकारी दगडू पवार साहेब उपस्थित होते.यावेळी लातूर तालुक्यातील शिक्षकांच्या एल आयसी हप्त्याचे वार्षिक २०१९- २०२० स्लीप/स्टेटमेंट मिळावे यासाठी शिक्षक काँग्रेस लातूरच्या वतीने निवेदन देऊन कळविण्यात आले होते.आज लातूर तालुक्यातील प्राथनिधीक स्वरूपात बाभळगाव-चाकोंडे, वासनगाव - मोगले सर, गंगापूर-स्वामी, केंद्रीय मुख्याध्यापक प्रशाला बोरी - लाळे मॕडम यांना स्लीपचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


     शिक्षक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशव भैय्या यांनी शिक्षक काँग्रेस शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात नेहमीच अग्रेसर भुमिका घेऊन लढत असल्याचे व या स्लीप एक दोन तालुकेच नाही तर लातूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील शिक्षकांना उपलब्ध करुण देण्याची मागणी केली व प्रबंधक साहेबांनी ही लातूर जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांना या स्लीप उपलब्ध करुन देऊ असे त्यांनी सांगितले. सभापती व उपसभापती यांनी लातूर तालुक्यातील शिक्षकांच्या आँनलाईन अध्यापनाचे कौतुक केले. आपल्या मनोगतात आम्ही शिक्षक काँग्रेस संघटनेच्या व शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात सदैव आपल्या सोबत राहून कार्य करु असे अभिवचन दिले.गटविकास अधिकारी गोडभरले शिक्षक काँग्रेस संघटनेचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे आपल्या मनोगतात व्यक्त केले.


         कार्यक्रमाचे बहरदार सुत्रसंचालन शिक्षक काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष जे.जे गायकवाड यांनी केले. शेवटी एल आयसी प्रतिनिधी व सल्लागार उमाकांत मुळे यांनी एल.आयसी आँफिसमधील कोणतेही काम असो मी शिक्षकांसाठी सदैव उपलब्ध असेन असे सांगितले.


Post a Comment

0 Comments