Latest News

6/recent/ticker-posts

अल्पसंख्यांक बहुभाषिक पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी पठाण रईस खान यांची निवड 

अल्पसंख्यांक बहुभाषिक पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी पठाण रईस खान यांची निवड 



बीड:(प्रतिनिधी/तुकाराम गुरसाळे) अल्पसंख्यांक बहुभाषिक पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी दैनिक एशिया एक्सप्रेस उर्दू चे जिल्हा प्रतिनिधी पठाण रईस खान नासिर खान यांची निवड करण्यात आली असून या विषयाचे पत्र त्यांना राज्य अध्यक्ष के.वाय.पटवेकर यांच्याकडून प्रदान करण्यात आला आहे. पठाण रईस खान नासिर खान यांना दिलेल्या नियुक्तीपत्र असे नमूद करण्यात आले आहे की आपण सामाजिक बांधिलकी घेऊन पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहात आपल्या कार्याची नोंद घेऊन पुढील कार्यास गती यावी व आपल्या हातून सामाजिक न्यायाचे संरक्षण व्हावे आणि पत्रकारितेची मान उंचावी या अपेक्षेने आपली अल्पसंख्याक बहुभाषिक संघाच्या बीड जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात येत आहे. पठाण रईस खान यांच्या या निवडीबद्दल त्यांना राज्य अध्यक्ष के.वाय.पटवेकर, उपाध्यक्ष मोसिन खान सचिव किशोर जैन सहसचिव एमआय शेख कोषाध्यक्ष इर्शाद आलम, सदस्य रवीनदर सिंघ, आनंद गायकवाड, खालेक पेंटर, इरफान शेख, रशीद खान पठाण,मारिया फर्नांडिस, सौ.कांचनमाला संगवे, अॅड शमीम शेख आदींनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.


Post a Comment

0 Comments