Latest News

6/recent/ticker-posts

औसा -मुरुड रोड वरील भादा गावातील पुलाची उंची वाढवण्याची मागणी

औसा -मुरुड रोड वरील भादा गावातील पुलाची उंची वाढवण्याची मागणी



लातूर:(जिल्हा प्रतिनिधी बी.जी.शेख)दि.१४ औसा-मुरुड रस्त्यावरील भादा येथील पुलाची उंची कमी असल्याने पाणी पुलावरून वाहत आहे यामुळे असेच गेल्या अनेक वर्षांपासून अशीच वाहतूकीची कोंडी होते,करिता पुढील भेटा,कोंड,आंदोरा,वडजी,जायफळ,कालमाथा,कवठा,नाहोली,बोरगाव,मुरुड या गावांना जाण्यासाठी येथून पर्यायी मार्ग नाही यामुळे किती मोठी समस्या यामध्ये भादा येथे पोलिस ठाने ,प्राथमिक आरोग्य केंद्र,वीज मंडळ,बँक,दोन जी प शाळा,पशु वैद्यकीय दवाखाना,मांजरा कारखाना कार्यालय अशी कार्यालय असून येथे नागरिकाची सतत वर्दळ असते यामुळेच तर येथे पावसामुळे निर्माण होणाऱ्या अडचणीस लातूर ग्रामीणचे आणि भादा सर्कलचे आमदार आणि खासदार यांनी या बाबत नागरिकांच्या मुख्य समस्येकडे लक्ष वेधून हि समस्या दूर करण्यासाठी सर्वस्वी आणि यशस्वी प्रयत्न करावे यासाठी कोणात्या तरी जिम्मेदार आणि जवाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करून हि समस्या ताबडतोड सोडवावी अशी मागणी या भागातील ऊस उत्पादक शेतकरी,नागरिक करीत आहेत.


Post a Comment

0 Comments