Latest News

6/recent/ticker-posts

देवणीत वृक्षारोपन व कोविड योध्दांना सन्मान पञ देऊन डी.टी.आंबेगावे यांचा वाढदिवस साजरा

देवणीत वृक्षारोपन व कोविड योध्दांना सन्मान पञ देऊन डी.टी.आंबेगावे यांचा वाढदिवस साजरा



देवणी:(प्रतिनिधी /विक्रम गायकवाड ) : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांचा कोविड योध्दांना सन्मान पत्र देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. डी.टी.आंबेगावे यांनी पुस्तक दान व वृक्षारोपन करून वाढदिवस साजरा केला. त्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, देवणी तालुक्याच्या वतीने पोलीस, डाॅक्टर, सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार, समुपदेशक, ग्रामसेवक, यांनी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता जनतेच्या सेवेसाठी कार्य केल्याबद्दल त्यांना कोविड योद्धा सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी संघाचे देवणी तालुकाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे, सुधाकर कांबळे संगमकर सामाजिक कार्यकर्ते प्रशांत रणदिवे, आनंद रणदिवे यांच्या वतीने डी.टी.आंबेगावे यांच्या वाढदिवसानिमित्त देवणी येथे वृक्षरोपण करण्यात आले नंतर कोविड योध्दांना सन्मानपञ देऊन गौरविण्यात आले. बोरोळचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. पांडुरंग कलंबरकर,पत्रकार विक्रम गायकवाड ,जाकिर बागवान,विनायक कांबळे पोलीस जमादार पोलिस ठाणे देवणी, यादुल पठाण, छगन मुराळे, राहुल आदावळे, अनिता सुर्यवंशी, श्रीदेवी कांबळे,थोरात पुष्पलता, इंगोले श्रीकृष्ण, नागनाथ सूर्यवंशी, सत्यशिला सरवदे, विकास लहू, सुनिता सूर्यवंशी, भागिरथा सूर्यवंशी, प्रेरणा जाधव,भरत मोरे, महानंदा भोजने यांना कोविड योध्दा सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी पञकार शकिल मनियार, कृष्णा पिजरे, शाखिर पठाण, रसिद मनियार, संतोष एनिले, साजिद बागवान,अनिल इदलकंटे, पटेल वहाबखान, डि.एन कांबळे,पठाण मुलतानी, शंकर पांचगे आदी पत्रकार व मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments