इतिहासात नोंद होईल इतक्या मताधिक्याने सतीश चव्हाण यांना निवडून देऊ- गहिनीनाथ महाराज औसेकर
लातूर:(जिल्हा प्रतिनिधी बी.जी.शेख)आज १३ नोव्हेंबर रोजी लातूर जिल्ह्यातील औसा येथे आझाद महाविद्यालयात पदवीधर मतदारांची सहविचार सभा पार पडली. यावेळी उपस्थित पदाधिकारी, शिक्षक, आणि पदवीधर मतदारांशी संवाद साधला. यावेळी श्रीक्षेत्र नाथ संस्थान मठाचे मठाधिपती श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल अशा विक्रमी मतांनी सतीश चव्हाण यांनाच निवडून द्यावे, असे आवाहन उपस्थितांना केले. यावेळी राज्याचे पाणीपुरवठा व महसुल राज्यमंत्री संजय बनसोड, मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, लातूर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. अफसर शेख, बी.एम. माळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका प्रमुख श्रीकांत सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नारायण लोखंडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष शकील शेख, सुभाष पवार, बबन भोसले, भारत सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष शेख जावेद, योगीराज पाटील, जावेद पटेल, रशीद पटेल, शिवसेनेचे सुरेश भुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा शहराध्यक्ष संतोष औटी, तालुका अध्यक्ष शिवाजी सावंत, विद्यार्थी शहराध्यक्ष अॅड. मुस्तफा इनामदार, गोविंद जाधव यांच्यासह पदवीधर, शिक्षक, प्राध्यापक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 Comments