औश्यात आज सतीश चव्हाण यांची सभा
लातूर:(प्रतिनिधी/बी.जी.शेख)दि.१३ - औसा. औसा येथील आझाद महाविद्यालयात पदवीधर निवडणुकीसंदर्भात सतीश चव्हाण हे प्रचारासाठी येणार आहेत. या प्रचार सभेत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन लातूर (ग्रामीण) जिल्ह्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा औसा नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अफसर शेख यांनी केले आहे.१३ नोव्हेंबर वार शुक्रवार ठिक अकरा वाजता या सभेचे आयोजन केले आहे. या सभेला इतर मोठे नेते उपस्थित राहणार असल्याने सर्व पदवीधर व नागरिकांनी या सभेचा लाभ घ्यावा असे आव्हान विद्यमान नगराध्यक्ष व माजी नगराध्यक्ष जावेद शेख यांनी केले आहे.
0 Comments