Latest News

6/recent/ticker-posts

शहरात तात्काळ सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करा-संभाजी ब्रिगेड निलंगा

शहरात तात्काळ सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करा-संभाजी ब्रिगेड निलंगा



निलंगा:(शहर प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा शहर, बस स्थानक, मुख्य बाजारपेठ व शासकीय बॅंका इ. ठिकाणी नैसर्गिक विधी पार पाडण्यासाठी सार्वजनिक स्वच्छता केंद्र तथा सार्वजनिक शौचालयाच्या अभावामुळे सर्वसामान्य जनतेची विशेष करून महिलांची कुचंबना होत असून संबंधित प्रशासनाकडून यासंदर्भात पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. तसेच नगर परिषदेचे मुतारी केंद्रे हे पाण्याअभावी व स्वच्छतेअभावी दुर्गंधीची केंद्रे बनली आहेत. तरी तात्काळ शौचालय व स्वच्छता गृहाची व्यवस्था करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी मागणी व इशारा संभाजी ब्रिगेड निलंगा कडून तहसीलदार, मुख्याधिकारी नगर परिषद निलंगा, आगर प्रमुख निलंगा बस स्थानक, शाखा व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक निलंगा यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. या निवेदनावर प्रमोद कदम, अध्यक्ष संभाजी ब्रिगेड निलंगा, इर्शाद आलम शेख, परमेश्वर बोधले, बिभीषण चव्हाण, अल्ताफ सय्यद, परमेश्वर नांगरे, पवन बिरादार, हाजु नाईकवाडे, कृष्णा बिरादार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Post a Comment

0 Comments