Latest News

6/recent/ticker-posts

कोविड योध्यांना पूर्ण पणे समावेश करा अश्या मागण्यांचे पालकमंत्री अमित देशमुख यांना निवेदन

कोविड योध्यांना पूर्ण पणे समावेश करा अश्या मागण्यांचे पालकमंत्री अमित देशमुख यांना निवेदन



निलंगा:(शहर प्रतिनिधी/इरफान शेख) आज निलंगा येथे ना.अमित विलासराव देशमुख (वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री लातूर) निलंगा विश्रामगृह येथे आले असता निलंगा येथील कोविड योध्यांना पूर्ण पणे सामावून करून घ्यावे अश्या मागण्यांचे निवेदन पालकमंत्री यांना देण्यात आले. कोरोना (कोविड -19) या महामारीच्या काळात जे कोरोना योद्धा म्हणून जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत त्यांना पूर्ण वेळ सेवेत सामावून घ्यावे.कोरोना सारख्या महाभयंकर महामारीच्या काळामध्ये आम्ही आमचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय अधिकारी , लॅब टेक्निशियन, औषधनिर्माता, परिचारक, परिचारिका, कक्षसेवक म्हणून कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या सर्व कोरोना योद्धाना पूर्ण वेळ सामावून घेण्यात यावे. या काळामध्ये आम्ही काम करत असताना आमचा जीव धोक्यात घालून, आमच्या परिवाराचा विचार न करता, आमचं भविष्य काय होईल काय नाही, हे माहित असताना सुद्धा आम्ही देशाची आणि राज्याची सेवा करीत आहोत. तरी आम्ही केलेल्या रुग्णसेवेचा सहानुभूती पूर्वक विचार करून आपण आरोग्य मंत्र्याशी चर्चा करून कोविड योद्याना पूर्ण पणे सेवेत समावेश करावे अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर डॉ.रत्नप्रभा गणेश, डॉ.सचिन अभंगे, मदार अलगुडे , विजय चव्हाण, प्रिती लोंढे , पेरमेश्वर श्रीमंगले ,गोपाळ जाधव , विजय घाडगे , मायादेवी पवार , मीना ढगे , पुथ्वी श्रीमंगले , स्वामी योगेश , रामदास सोमवंशी , मुजीब नासरजंग ,स्वामी प्रतीक्षा , माने आशिष , भोसले सुमित , सुरवसे संकेत , अविनाश जाधव ,सुमित आपेट ,इरफान शेख आदी जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 


Post a Comment

0 Comments