Latest News

6/recent/ticker-posts

दिग्दर्शक अमोल राजेंद्र लोंढे यांच्या नवीन कलाकृतीच चित्रीकरण पुण्यात सुरू 

दिग्दर्शक अमोल राजेंद्र लोंढे यांच्या नवीन कलाकृतीच चित्रीकरण पुण्यात सुरू 



{बाबुराव आगलावे}


पुणे:लेखक आणि दिग्दर्शक अमोल राजेंद्र लोंढे यांच्या नवीन कलाकृतीच चित्रीकरण नुकतच पुणे शहरात सुरू झालं आहे. नवीन कलाकारांना घेऊन काम करणं त्यांना नेहमीच आवडतं. यावेळी अपेक्षा फुगे,अक्षय लाड, रमाकांत भोईटे यांना प्रमुख भूमिकेत घेऊन त्यांनी पुणे शहरात चित्रिकरण सुरू केलं आहे. साहाय्यक भुमिकेत ते स्वत: अभिनय करत आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव स्टेशन-चौफुला,पाटस,कानगाव आणि भिमा नदिच्या काठी सर्व परवानगी सहित चित्रिकरण करण्यात येत आहे. याची निर्मिती Life line Production या निर्मिती संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. याचे निर्माते प्रशांत शेळके हे आहेत.याच चित्रिकरण छायाचित्रकार अमोल यादव हे करत आहेत. अर्थव स्टुडिओ पोस्टर शुट करत आहे. त्यांनी विशाल गायकवाड, आकाश साळूंके, सुशील लोंढे,शुभम लोंढे,बालाजी नन्नवरे, सिद्धार्थ गायकवाड,सौरभ पाटील यांचे आभार मानले आहेत.


Post a Comment

0 Comments