Latest News

6/recent/ticker-posts

औश्यातील गरिबांचे फंक्शन हाॅल राहणार का संपणार

औश्यातील गरिबांचे फंक्शन हाॅल राहणार का संपणार?



लातूर:(प्रतिनिधी बी.जी.शेख)दि.१४ - औसा तालुक्यातील नगरपालिकेचे संस्कृतीक सभागृह हे गरिबांचे फंक्शन हॉल म्हणून ओळखले जाते. शहरात घरातील छोटे-मोठे कार्यक्रम याठिकाणी होत असतात.मात्र मागील अनेक दिवसापासून या सांस्कृतिक सभागृहची अवस्था दयनीय झाली आहे. या होणाऱ्या परवडीकडे स्थानिक प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याची चर्चा शहरात आहे. शहराच्या विकासासाठी शासनाने जवळपास पाच कोटी रुपये पालिकेला दिले आहेत.पालिकेने यातील काही अंश जरी या सभागृहावर खर्च केला असता तर हे सभागृह औसा शहरात शानदार दिसले असते. सभागृहाची पडझड मोठ्या प्रमाणात झाली आहे. ापूर्वीही बर्‍याच माध्यमातून हा प्रश्न मिडियाने उभा केला होता. मात्र त्याकडेही येथील प्रशासनाचे लक्ष गेले नाही. सभागृहाच्या आवारात गाळ्यांचे बांधकाम झाल्याने मंडप टाकण्यास अडचण होत आहे.याच ठिकाणी ज्या वेळेला सभागृहात कोणता कार्यक्रम नसतो त्या वेळेला काही वहाने या ठिकाणी उभी असतात. मागील काही दिवसांपासून सभागृहाच्या जागेत पालिका शेड लावत आहे. यामुळेही अडचण निर्माण होणार आहे. सभाग्रहांची दुरुस्ती करणे, सभागृहाच्या आवारात येणाऱ्या अडचणी दूर करून त्याचा विस्तार करणे आवश्यक असताना या ठिकाणी जाणून-बुजून दाटीवाटी केली जात असल्याची चर्चा शहरात आहे. एकूणच शहरात सर्वसामान्यांचे असलेले हे फंक्शन हॉल संपवण्याचे षड्यंत्र येथील नेते मंडळीकडुन होत नाही ना ?असे बोलले जात आहे. कारण येथील बऱ्याच नेते मंडळींचे मंगल कार्यालय आहे. या ठिकाणची आवक कमी झाल्याने हे सभागृह संपवण्याचा डाव असल्याची चर्चा शहरात आहे.


Post a Comment

0 Comments