मनोजकुमार सोनटक्के यांचे निधन
चाकूर: येथील मनोजकुमार बाबूराव सोनटक्के (वय,५०) यांचे विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्था लातूर येथे शनिवारी (ता.१४) उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर चाकूर येथील शेतात रविवारी (ता.१५) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी युवा काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस म्हणून कारकीर्द गाजवली होती. ते माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निकटवर्तीय होते. त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, बहीण, भाऊजी, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा मोठा परिवार आहे. लातूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विजयकुमार सोनटक्के यांचे ते लहान बंधू होते.
0 Comments