Latest News

6/recent/ticker-posts

महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये-बोईनवाड

महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये-बोईनवाड



देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) ग्रामीण महिला विकास संस्था देवणी व ग्लोबल फंड फॉर वुमेन अस्मिता प्रकल्प च्या वतीने मौजे कमालवाडी य़ेथील अंगणवाडी या ठिकाणी आयोजित केलेल्या महिलांचे अधिकार व हक्क प्रशिक्षणा प्रसंगी मार्गदर्शन करताना बोईनवाड असे म्हणाले की, विनाकारण वेळेवर जेवण न केल्याने स्वतःचे आरोग्य धोक्यात घालत आहेत याबद्दल आपली आता मानसिकता बदलण्याची गरज आहे असे उद्देशून महिलांना सांगितले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून अँड,के .टी कांबळे य़ांनी महिलांना संरक्षण देणारे कायदे कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005, संयुक्त मालकी, बालविवाह,यासंबंधी मार्गदर्शन केले.प्रास्ताविकामध्ये सुखवास रामराव इसाळे यांनी अस्मिता प्रकल्प संकल्पनेमध्ये महिलांचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक,राजकीय क्षेत्रात नेतृत्वशील महिला होऊन स्वाभिमानाचे जीवन जगावे,असा उल्लेख करत असताऩा महिलांनी स्थावर व जंगम मालमत्ता यामध्ये आपला कसा समावेश करता येईल या बाबतीत विवेकी बनून प्रयत्नशील असणे काळाची गरज आहे, आत्ता आपण करत असलेल्या कार्याचे फळ येणाऱ्या पिढीतील महिलासाठी न्यायिक ठरल्याशिवाय राहत नाही या कार्यक्रमाचा हेतू हा आहे असे सांगण्यात आले. उपस्थित म्हणून गट शिक्षणाधिकारी बोईनवाड पंचायत समिती देवणी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चे मुख्याध्यापक ऊबदाळे साहेब, ग्रामीण महिला विकास संस्थेचे कार्यकर्ते सुखवास इसाळे, सुनिताताई सूर्यवंशी, भागीरथाबाई सूर्यवंशी ,आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचत गटाचे अध्यक्ष सचिव सदस्य गावात असलेल्या विविध मंडळातील महिला यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण पार पाडले.


Post a Comment

0 Comments