लातूर जिल्हा युवासेनेतर्फे दोन हजार शेतकरी बांधवाना मोफत कामगंध सापळे
लातूर:{प्रतिनिधी} जिल्हा युवासेनेच्या वतीने लातूर जिल्ह्यातील प्रथम नोंदणी करणाऱ्या 2000 शेतकरी बांधवांना मोफत कामगंध सापळे देण्यात येणार असून प्रत्येक शेतकरी बांधवा कडून फक्त त्यासाठी लागणाऱ्या गोळीचा खर्च 150रु घेण्यात येणार आहे प्रत्येक शेतकऱ्याला एकरी 10 सापळे मोफत दिले जाणार असून याच्या उपयोगाने कीटकनाशक फवारणीचा 50%खर्च कमी होणार असून हा एक शेतकरी बांधवपोटी युवासेनेचा पहिलाच उपक्रम जिल्हयात होत आहे नांव नोंदणीसाठी- प्रा.सुरज दामरे युवासेना व सिनेट संपर्क कार्यालय खाडगाव रोड लातूर येथे संपर्क साधावा 8421290999
0 Comments