आकस बुद्धीने दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा या मागणीचे निवेदन;जनतेतून वाढता रोष
लातूर:(जिल्हा प्रतिनिधी बी.जी.शेख)दि.५ - औसा. 30 ऑक्टोबर रोजी फ्रान्सच्या अध्यक्षा विरोधात सोशल डिस्टंसिंग पाळुन पाच ते सहा व्यक्तींनी मिळुन पुतळा जाळून निषेध व्यक्त केला होता. या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा गुन्हा रद्द करावा म्हणून येथील मोमीन समाज युवा मंच च्या वतीने मुख्यमंत्री यांना तहसिलदारामार्फत निवेदन देण्यात आले. निवेदनात सामाजिक कार्यकर्ते खुनमीर मुल्ला, बाबा पटेल, अॅड शहनावाज पटेल, अॅड मजहर शेख, व ईतरां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा रद्द करावा असे निवेदनात म्हटले आहे. शहरात अनेक समस्या असताना या छोट्या बाबीकडे इतके गांभीर्याने का घेतले गेले हा प्रश्न चर्चिला जात आहे. शहरात राजरोसपणे गुटखा विक्री केली जात आहे, सोशल डिस्टंसिंग पालन न करता अनेक हॉटेल्समध्ये गर्दी केली जात आहे. मटका मोठ्या प्रमाणावर घेतला जात आहे, मागील काही दिवसांपूर्वी प्रत्यक्ष पोलीस अधीक्षकांनी मटका घेत असताना धाडी टाकून दोघांना अटक केली होती. औस्याचे आमदार अभिमन्यु पवार यांनी प्रत्यक्ष पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन शहरात व तालुक्यात होणारी दारूविक्री व मटका बंदी करावी अशी मागणी केली होती. आशा वेगवेगळ्या समस्या असताना या निषेध व्यक्त करण्याकडे कसे लक्ष गेले याची चर्चा शहरात आहे. एखाद्या समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यानंतर लोकशाही मार्गाने त्याचा निषेध व्यक्त केला जातो.अशाच पद्धतीचा निषेध शहरात सर्वसामान्य लोकांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन करून व्यक्त केला. त्यामध्ये त्यांनी पूर्व परवानगी किंवा सूचना दिली नाही हे कारण पुढे करून उपस्थित नागरिकांवर गुन्हा नोंद केला जात असेल तर याला काय म्हणावे? असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. या संबंधित प्रकरणी निवृत्त न्यायमूर्ती यांच्यामार्फत चौकशी करून संबंधित एफआयआर रद्द करा अशी मागणी मोमीन युवा मंचातर्फे करण्यात आली आहे. हा गुन्हा रद्द करावा यासाठी नागरिकातून दबाव वाढत आहे.
0 Comments