मराठा सेवा संघाच्या निलंगा तालुकाध्यक्षपदी प्रा.डॉ.हंसराज भोसले यांची निवड
निलंगा:{शहर प्रतिनिधी/इरफान शेख) प्रा.डॉ.हंसराज भोसले यांची मराठा सेवा संघाच्या निलंगा तालुकाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. सर्वोत्तम चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविणारे,बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक क्रांती घडवून आणलेले, उत्तम थॉटस द्वारे नियमितपणे वैचारिक मेजवानी देणारे उत्तमजी शेळके आणि विविध सामाजिक उपक्रमात सहभागी असणारे, आदर्श शिक्षक,शिक्षक समितीचे सरचिटणीस गणेशजी गायकवाड यांची मराठा सेवा संघ निलंगा तालुका उपाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली या निवडीचे मराठा सेवा संघ जिल्हाअध्यक्ष विभागीय अध्यक्ष लिंबराज सूर्यवंशी, संभाजी ब्रिगेडचे प्रमोद कदम,उमाकांतजी उफाडे, अभिमन्यू पवार, शिक्षक संघ, वकील मंडळ, डॉक्टर असोसिएशन,काँग्रेसचे युवा नेते अभय साळुंके, निलंगा नगर परिषदचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे विविध सामाजिक संघटणांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
0 Comments