Latest News

6/recent/ticker-posts

अर्णबला रायगड येथून डिझायनर च्या आत्महत्येप्रकरणी अटक

अर्णबला रायगड येथून डिझायनर च्या आत्महत्येप्रकरणी अटक




बी.जी.शेख


मुंबई: दि.४ - पोलीस अधिकारी वाझे यांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केली. याला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे.रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यास पोलिसांनी आज सकाळी त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. रायगडच्या अलिबाग येथे इंटेरियर डिझायनर नाईक यांनी आत्महत्या केली होती. या आत्महत्येसाठी अर्णब गोस्वामी यांनी प्रवृत्त केल्याचा आरोप नाईक कुटुंबीयांनी केला होता.यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पथकाने अर्णब गोस्वामी यांना अटक केली. अर्णब यास अलिबागच्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे.यावेळी अर्णव गोस्वामी यांना पोलीस पकडून घेऊन जात असताना त्यांनी पोलिसावर गंभीर आरोप लावले.तो म्हणाला मला औषधेही घेऊ दिली नाही. मला पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप स्वामी केला आहे.मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरियर डिझायनर नाईक या व्यक्तीने ५ मे दोन 2018 रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या शेजारी त्यांच्या आईचा मृतदेह आढळला होता. मधुकर नाईक आर्थिक विवंचनेत येऊन आत्महत्या केली होती. त्यांचा इंटेरियर डिझायनर चा व्यवसाय होता. त्यामुळे कर्जदार त्यांच्याकडे पैशाचा तगादा लावत होते. यात त्याने आपले जीवन संपवण्याचे ठरवले. आत्महत्या करण्यापुर्वी अर्णब यांनी कामाचे पैसे दिले नसल्यामुळे आत्महत्या करत असल्याची चिठ्ठीत लिहून ठेवले होते त्यामुळे सारडा, फिरोज शेख व अर्णब या तिघांची चौकशी करण्यात आली होती.


Post a Comment

0 Comments