लोकनियुक्त नगराध्यक्षानी आत्तापर्यंत केले चार प्रभारी नगराध्यक्ष;सर्वांना समान संधी देण्याचा प्रयत्न
लातूर:( प्रतिनिधी बी जी शेख)दि.७ - औसा तालुक्यातील नगरपालिका ही बहुमताने राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे येथील नगराध्यक्ष लोकनियुक्त असल्याने त्यांनी आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत चार नगरसेवकांना प्रभारी नगराध्यक्ष पद दिले आहेत.या कारणामुळे डॉ. अफसर शेख यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे.सुरुवातीला मराठा समाजाचे भरत सूर्यवंशी त्यानंतर जावेद शेख, मेहराज शेख, अलिशेर कुरेशी अशा चार लोकांना त्यांनी नगराध्यक्षपदाची माळ घातली.या वेळेला इतिहासात प्रथमच कुरेशी समाजाला नगराध्यक्षपद मिळाल्याने त्या समाजात आनंदाचे वातावरण आहे. एकूण वीस नगरसेवकांपैकी 12 नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत तरी सर्व नगरसेवकांना समान संधी देत, सर्वांना एकत्र करून पालिकेचा कारभार हाकला जात आहे. प्रत्येक नगराध्यक्षांनी आपापल्या कारकिर्दीत वेगळा ठसा उमटवला आहे.तसा कुरेशी समाजाचा नगराध्यक्ष झाल्याने या नगराध्यक्षांनी ही चांगली कामे करून आपले नाव लौकिक करतील अशी अपेक्षा जनता बाळगून आहे.
0 Comments