Latest News

6/recent/ticker-posts

कॅरी अॉन विद्यार्थ्यांच्या परीक्षा अॉनलाईन घ्याव्यात-सौरव जाधव    

कॅरी अॉन विद्यार्थ्यांच्या परीक्षा अॉनलाईन घ्याव्यात-सौरव जाधव  



नांदेड:(प्रतिनिधी/उस्मान शेख) कोरोना काळात इतर विद्यार्थ्यांच्या अॉनलाईन परीक्षा घेण्यात आल्या त्या प्रकारे कॅरी अॉन विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुध्दा अॉनलाईन व्हाव्यात अशी मागणी आता होत आहे. अाता पर्यंत कोरोनानी अनेकांचा बळी घेतला आहे. दिवसेंदिवस covid-19चा प्रादुर्भाव वाढत आहे कोरूना अजून संपलेला नाही अजून लस आलेली नाही. विद्यापिठानी विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ चालवलाय का ? असा सवाल या वेळी उपस्थीत केला जातोय. लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण करुन कोरोना संकटात जीव मुठीत घेऊन परीक्षा देने कितपत योग्य आहे ? जर परीक्षा केंद्रावर लेखी पध्दतीने घेण्यात आल्या तर बाहेरुन येणार्‍या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रभरातून येण्याजाण्याचे व जिथे परीक्षा आहे तिथे राहण्याचे व खाण्याचे हाल होतील. जर परीक्षेदरम्यान एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळल्यास याची जबाबदारी विद्यापीठ घेणार का ? परीक्षेदरम्यान विद्यार्थी covid-19 पॉझिटिव्ह झाला तर त्याचा हॉस्पिटलचा खर्च कोण उचलणार जर कदाचित त्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर त्याचा जबाबदार कोण ? एकीकडे महाराष्ट्रातील अनेक नामांकित विद्यापीठ ऑनलाइन/होम असाइनमेंट पद्धतीने परीक्षा घेत आहेत तरी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कुलगुरु, परीक्षा विभाग प्रमुख हे ऑफलाईन परीक्षेचा हट का धरताहेत विद्यार्थ्यांचे जीवाशी का खेळत आहे हे समजण्याच्या पलिकडची बाब आहे. अश्या अनेक प्रश्नांवरुन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सौरव जाधव यांनी लक्ष वेधले आहे. विद्यापिठानी अत्तापर्यंत ज्याप्रकारे विद्यार्थी हीताचे निर्णय घेतले आहेत त्याचप्रकारे विद्यार्थ्यांचा हिताचा आरोग्याचा विचार करावा अशी विनंती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ने केली आहे,अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तीव्र अंदोलन छेडेल असे या वेळी सौरव जाधव यांनी सांगीतले.


Post a Comment

0 Comments