पाखरांनो घ्या भरारी नव्या क्षितिजाकडे ! दु:ख तुम्ही विसरुनी !!
आई-वडीलांची सावली हरवलेल्या लेकरांना बालाजी शिंदे ची मदत
(बाबुराव आगलावे)
सापडले जरी घरटे वादळात माझे '
आधार इतरांना देणार मी '
अश्रुंच्या वणव्यात अडकले जर कोणी तर तिथे सावली होवुन
येणार मी असाच जणु संदेश देत येथील उदारमतवादी दातृत्व बालाजी शिंदे यांनी आज भादा येथील आई-वडीलांचे छत्र हरवलेल्या दोन लेकरांना त्यांच्या भविष्यातील शिक्षण 'कपडे' व राशन चा सर्व खर्च उतलण्याची जिम्मेदारी घेवुन आज मदत केली. भादा ता.औसा येथील हजारे कुटूंबातील स्वाती व विशाल या भावंडांना हि मदत आज देण्यात आली. येथील कुंडलीक हजारे यांचे काही वर्षापूर्वीच अकस्मात निधन झाले होते. तर कालच्या दिपवाळीत त्यांच्या पत्नी चेही अचानक अपघाती निधन झाले . अचानक आईचे ही छत्र हरवलेल्या धक्यातुन या भावंडांना सावरण्याचा प्रयत्न करत येथुन पुढे त्यांच्या शिक्षणाचा व कपडे ' तशेच राशन चाही सर्व खर्च त्यांचे शिक्षण पुर्ण होई पर्यंत येथील उदारमतवादी दातृत्व बालाजी शिंदे यांनी शिक्षणाची पुढील दोन भावंडांची जिम्मेदारी स्विकारली असुन आज त्यांच्या घरी जावुन वह्या 'पेना' रजिस्टर 'चप्पल' बुट' व एक मोबाईल या वस्तु त्यांना दिल्या. या मदतीसाठी माजी ग्राम पंचायत सदस्य खलील सय्यद यांनी महत्वाची कामगीरी केली. यावेळी भादा जि. प. प्रशालाचे मुख्याध्यापक अनंतवार सर 'राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक शिवलींग नागपुरे सर ' माजी ग्राम पंचायत सदस्य खलील सय्यद ' स्वस्त धान्य दुकानदार लहु हजारे ' दयानंद पाटील ' रघुनाथ चांभारगे 'अंबादास चांभारगे केशव हजारे हे उपस्थित होते. या भावंडांना भादा जि. प. प्रशालेकडुनही मदत दिली जाईल अशी माहीती मुख्याध्यापक अनंतवार सर व शिवलींग नागापुरे यांनी दिली.

0 Comments