कादीर जागिरदार यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड
नळेगाव:{प्रतिनिधी} नळेगाव येथील कादीर नजीब जागिरदार यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. सदर निवड राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे प्रदेश अध्यक्ष महेबुबभाई शेख यांच्या हस्ते लातूर येथे करण्यात आली.नियुक्ती पञ देताना या वेळी प्रदेश कार्यध्यक्ष सुरज चव्हाण, जिल्हा अघ्यक्ष चंदन पाटील नागराळकर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भोसले, शहर जिल्हाध्यक्ष समीर शेख उपस्थित होते. या निवडीबद्दल आ.बाबासाहेब पाटील,अहमदपूर माजी नगर उपाध्यक्ष मुजीब पटेल जागिरदार, गटनेते डॉ.फुजैल जागिरदार,मु.अ.वहाब जागिरदार यांनी कादीर जागीरदार यांचे अभिनंदन केले आहे. पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जागिरदार यांनी सांगितले.

0 Comments