कै.रसिका महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य दलात निवड
देवणी:येथील कै.रसिका महाविद्यालयाच्या माधव गणेश बोंद्रे, ईश्वर फाल्गुन जाधव दोन विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य दलातनु कतीच निवड झाली आहे. या निवडीबद्दल विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार जागृती शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजचे चेअरमन लक्ष्मणरावजी मोरे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस गोविंदरावजी भोपणीकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी संस्थासचिव गजाननजी भोपणीकर, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सरव्यवस्थापक तानाजी जाधव प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे, क्रीडा संचालक डॉ. सचिन चामले, डॉ. प्रशांत भंडे, भंडारे, व्यंकटराव पाटील वलांडीकर, बालाजी बोबडे अनंत पाटील टाकळीकर यांच्यासह देवणी तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन, सदस्य व तालुक्यातील मान्यवरांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

0 Comments