Latest News

6/recent/ticker-posts

कोविड 19 लसिकरणांचा शुभारंभ,आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते

कोविड 19 लसिकरणांचा शुभारंभ,आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते 


चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) चाकुर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय चाकुर येथे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत कोविड-19  प्रतिबंदक लसीकरणाचा प्रारंभ झाला. 

ज्या कोरोनामुळे लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले, ज्या कोरोनामुळे सर्वांना भय- दडपणाखाली रहावे लागले, ज्या कोरोनामुळे अनेकांवर आर्थिक-मानसिक संकट कोसळले त्या कोरोनावर विजय मिळवण्याचा आजचा दिवस. त्यामुळेच आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे. 

कोविड लसीकरणाच्या दुसऱ्या टप्पात तालुक्यातील 824 जणांची नोंदणी करण्यात आली आहे. यात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशाताई, अंगणवाडी कार्यकर्ती याना लस दिली जाणार असुन सोमवारी लसीकरणांस सुरुवात झाली.

ग्रामीण रुग्णालय चाकुर येथे आमदार बाबासाहेब पाटील  यांच्या उपस्थितीत कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाचा आज प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवकांना ही लस दिली जात आहे.

ग्रामीण रुगणालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमांस आमदार बाबासाहेब पाटील, जि.प.समाजकल्याण सभापती रोहीदास वाघमारे, जि.प.सदस्य हर्षवर्धन कसबे, प.स.उपसभापती सज्जनकुमार लोणाळे, माजी प.स.सभापती, नगरसेवक करीमसाब गुळवे, शिवानंद हेंगणे, मिलिंद महालिंगे, बालाजी सुर्यवंशी, बालाजी पाटील चाकुरकर, हरिभाऊ काळे, दयानंद सुरवसे,राहुल सुरवसे, इलियास सय्यद, अंगद पवार, गणेश फुलारी, बिलाल पठाण, संदीप शेटे यांची उपस्थिती होती. वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिलीप लांडे प्रस्वाविकातुन लसीकरणा बाबत माहिती दिली.डॉ.कल्पेश लांडे यांना आमदार बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थिती पहिली लस देण्यात आली.तालुक्यात 1083 कोरोना बाधित झाले आहेत. 43 जणांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी पुर्ण तैयारी करण्यात आली आहे.

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवकांनी कोरोनाच्या कठीण काळात जी सेवा दिली ती कौतुकास्पद आहे. त्यांच्याबरोबरच अत्यंत कमी वेळात लस तयार केल्याबद्दल वैज्ञानिकांचे अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. लसीबाबत पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अर्चना पंडगे, वैद्यकिय अधिकारी डॉ.संग्राम नरवटे, डॉ.अरुणेश्वर बालंकुदे, डॉ.पी.व्ही.कोटगीरे, डॉ.प्रियंका चव्हाण, डॉ.श्रीनिवास हसनाळे, डॉ.सुधीर चव्हाण, अमोल उटगे आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments