Latest News

6/recent/ticker-posts

सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत बोधे यांचा "कोव्हीड योद्धा" म्हणून सन्मान

सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत बोधे यांचा "कोव्हीड योद्धा" म्हणून सन्मान


सोलापूर:(प्रतिनिधी) कोरोना काळात सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या दृष्टीने covid-19 च्या विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेकामी यांनी उत्कृष्टरीत्या काम केल्याने जिल्हा प्रशासनातर्फे प्रशस्तीपत्रद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत "कोव्हीड योद्धा" म्हणून गौरविण्यात आले. आज प्रजासत्ताक दिना निमित्त सोलापूर शहर पोलीस ग्राउंड येथे जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्रीमती तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी,नागरिक उपस्थित होते.

या सन्मानाबद्दल "मराठी अस्मितेचे इशारा" वृत्तपत्राचे संपादक के वाय पटवेकर, मुक्तार सिद्दिकी, विशाल कोथमिरे, अतुल तांदळे, सागर तापडिया व मित्रपरिवारतून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments