Latest News

6/recent/ticker-posts

वहाब जागीरदार यांचा कार्याचा सन्मान

वहाब जागीरदार यांचा कार्याचा सन्मान



नळेगाव:(प्रतिनिधि) येथील अल फारुख उर्दू विद्यालयचे मुख्याध्यापक  वहाब जागीरदार यांचा तहसील कार्यालय चाकूर येथे तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. कोरोना काळात नळेगाव येथे अल फारुख उर्दू विद्यालय कोरेनटाइन साठी शाळा उपलब्ध करून दिल्या बदल आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जागीरदार यांना प्रशस्तीपत्र देउन सत्कार करण्यात आला. या वेळी तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे साहेब, चाकूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सिरसाठ, चाकूर पंचायत समिति चे सभापति जमुनाताई बडे, चाकूर नगरपंचायत चे मुख्यकार्यकारी अधिकारी अजिंक्य रणदिवे, पोलीस उपनिरीक्षक निलम घोरपडे, माजी सभापति करीम गुळवे, नगरसेवक इलियास सय्यद, युराज पाटील, यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी,नागरिक उपस्थित होते. या सन्मानाबद्दल नगरसेवक डॉ. फ़ुजैल जागीरदार, प्राथमिकचे मुख्याध्यापक कादिर जागीरदार, उस्मान इनामदार, सय्यद फय्याज, रियाज़ पठान, फैसल कोतवाल, सोहैल घोरवाड़े, ज़ाहिर गोंड़गावे व मित्रपरिवारतून जागीरदार यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments