उद्यापासुन सुरू होणार इयत्ता पाचवी ते आठवी चे वर्ग
5 वी ते 8 वी वर्गाचे निर्जंतुकीकरण
{ बाबुराव आगलावे }
कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेले वर्ग शासन परिपत्रकानुसार जि. प. कन्या व प्रशाला भादा ता. औसा येथील 5 वी ते 8 वीचे प्रत्यक्ष वर्ग दि. 27 जानेवारी 2021 पासून सुरुवात होणार आहेत. Covid-19 संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून दोन्ही प्रशालेचे मुख्याध्यापक रमेश अनंतवार यांनी प्रशालेचा परिसर व सर्व वर्ग 5 वी ते 8 वी वर्गाचे निर्जंतुकीकरण करून घेतले. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अर्जुन लटूरे व शिक्षक उपस्थित होते. यापूर्वी 9 वी 10 वर्गाची खबरदारी म्हणून दररोज निर्जंतुकीकरण केले जात असे. पालकांनी संमतीपत्र दिल्यानंतर च विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाईल तसेच विद्यार्थ्यांनी मास्कचा वापर करावा असे मुख्याध्यापकांनी सांगितले.

0 Comments