प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यालयास कालदर्शिका भेट
नळेगाव:(प्रतिनिधी) प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येथील विविध कार्यालयास "मराठी अस्मितेचा इशारा" या वृत्तपत्राच्या कालदर्शिकेचे वितरण संतोष तेलंगे यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये येथील माजी सैनिक संघटनेचे सुभेदार- त्र्यंबक जोगदंड, नागनाथ वाडेकर, अंकुश फरकाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी-सुधीर चव्हाण महावितरणचे अमोल मुखेडकर (सहाय्यक अभियंता) पोलीस चौकीचे गणेश बुजारे यांना कालदर्शिका भेट देत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

0 Comments