कलांडी येथे दारूबंदीसाठी महिलांनी ठोकले ग्रामपंचायतला टाळे; महिला झाल्या आक्रमक
केळगाव:(प्रतिनिधी/वसीम मुजावर) निलंगा तालुक्यातील कलांडी येथे गेल्या अनेक वर्षापासून अवैध दारू विक्री वाढली आहे. यामुळे गावातील अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. दारूबंदीची वारंवार मागणी करूनही पोलिसांनी याकडे डोळेझाक केले आहे शिवाय ग्रामपंचायतीने ही दुर्लक्ष केल्याचा आरोप महिलांनी केला आहे मटका व दारू विक्री कायमस्वरूपी बंद करावी या मागणीसाठी गावातील संतप्त महिलांनी आज कलांडी येथील ग्रामपंचायत कार्यालयाला प्रजासत्ताक दिनीच आज ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर शिवसेनेचे साईनाथ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाने व गावातील संपूर्ण महिलांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीला टाळे लावण्यात आले व ग्रामपंचायत कुलूप बंद करण्यात आले. गावातील दारू विक्री थांबणार नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीचे कुलूप काढणार नाही अशी भूमिका महिलांनी घेतली होती. त्यामुळे काही काळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गावात चार ते 5 ठिकाणी अवैध दारू विकली जात आहे वारंवार सांगून सुद्धा काहीच फरक पडत नसल्याने शेवटी महिलांना आज ग्रामपंचायत बंद करावी लागली आहे त्यामुळे आज तालुक्यात कलांडी येथील ग्रामपंचायत चा दारूबंदी वरील मुद्दा चांगलाच गाजला महिलांनी पोलीस प्रशासनाला व गावातील पुढाऱ्याला चांगलेच धारेवर धरले होते हे चिघळलेल्या आंदोलन आक्रमक झाल्यानंतर शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक यांना साईनाथ सूर्यवंशी व महिलांच्या वतीने दारू बंद करण्यासाठी निवेदन देण्यात आले त्यावेळी प्रसाद सूर्यवंशी, देविदास सूर्यवंशी, माधव सूर्यवंशी, अखिल सूर्यवंशी, देवा घोरपडे ,एडवोकेट राहुल हांडे ,लखन सूर्यवंशी, गणेश कदम गावातील प्रतिष्ठित नागरिक रावसाहेब सूर्यवंशी, सरपंच कडाजी सूर्यवंशी ग्रामसेवक शिंदे गावातील तरुण वर्ग व गावातील महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या लवकरात लवकर गाव दारूमुक्त करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पोलिसांना महिलांनी दिला आहे.
अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल व यापुढील गावात अवैध दारू विक्री करू देणार नाही असे पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक मल्लय्या स्वामीं यांनी सांगितले.

0 Comments