Latest News

6/recent/ticker-posts

भादा येथे संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन प्रजासत्ताक दिन साजरा

भादा येथे संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक  वाचन प्रजासत्ताक दिन साजरा


औसा:(तालुका प्रतिनिधी/बी डी उबाळे) दि.२७ -  औसा तालुक्यातील भादा येथे संविधान प्रस्ताविककेचे सामूहिक वाचन करून ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. भादा या गावची औसा तालुक्यातील मोठी आणि बहुचर्चित असलेली ग्रामपंचायत असून याठिकाणी सध्या प्रशासकीय कारभार सुरु असून प्रशासक म्हणून जयंत जाधव यांच्या हस्ते २६ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ०८ वाजून ०५ मिनिटाने ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्राम विकास अधिकारी माणिक सूर्यवंशी यांनी प्रथम संविधान प्रस्ताविकेचे स्पिकरमध्ये वाचन केले त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ नागरिकांकडून सामूहिक संविधान प्रास्ताविक सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत भादा समोर मोठ्या संख्येने शिक्षक, शासकीय कर्मचारी, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, माजी सदस्य आणि भादेकर तरुण मित्र मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

Post a Comment

0 Comments