Latest News

6/recent/ticker-posts

थकीत विजबिल माफ करावे- अफसर शेख

थकीत विजबिल माफ करावे- अफसर शेख 


औसा:(तालुका प्रतिनिधी/बी डी उबाळे) दि.२७ - एम आय एम पक्षा तर्फे मा. खासदार इम्तीयाज जलिल साहेब व महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डाँ. अब्दुल गफ्फार कादरी यांच्या आदेशानुसार औसा तालूका प्रभारी अफसर शेख यांच्या अध्यक्षतेखाली शहर औसा तालुक्यातील विद्युत ग्राहकधारकांचे कोव्हीड -१९ च्या लाॅकडाऊन काळातील थकीत बाकी बिलाच्यावर व्याज रद्द करणे व लाॅकडाऊनच्या काळातील बिल माफ करणे व तसेच विद्युत बाकी थकीत बिल चार टप्प्यात भरने करून घेण्यात यावे. यासाठी निवेदन देण्यात आले.

या वेळी अमजद शेख, सय्यद आदिल, शेख सादेख, युसुफ कुरेशी, अझहर शेख, सोमनाथ खरात, अय्याज शेख, शेख नबी, सिद्दीखी लुकमान आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments