भाद्याच्या मतदारांची ' जुनं तेच सोनं। ला पसंती
मतदारांनो विकास कामासाठी मै हुँ ना! चा आवाज देत भाद्यात पुन्हा बालाजी शिंदेचं ऩिर्विवाद वर्चस्व
{बाबुराव आगलावे}
लातुर जिल्ह्यातील विकास कामासाठी सतत चर्चेत असलेल्या व औसा तालुक्यातील एक मोठी असलेल्या भादा ग्रामपंचायतच्या कारभारासाठी मतदारांनी पुन्हा बालाजी शिंदे यांच्या विकास कामावर विश्वास ठेवुन आपल्या मतातुन जुन तेच सोनं चा जणु एक प्रकारचा संदेशच दिला आहे. त्यांच्या या मतादानाच्या आशिर्वादाचा स्विकार करत भादेकरांनो विकास कामासाठी मै हुँ ना चा प्रतिसाद देत पुन्हा गावच्या कारभारावर बालाजी शिंदे यांनी बहुमताने बाजी मारली आहे. मात्र वाँर्ड क्र. तीनमध्ये त्यांना आपल्या पँनलची एक जागा गमवावी लागली असुन तिथे अमोल पाटील भादेकर यांनी गावच्या राजकारभारात आता मै भी आ रहा हुँ म्हणत विजय संपादन केला आहे. विशेष म्हणजे या वेळेस अनेक तरुण चेह-यांनी राजकाराभारात आपली दमदार एन्ट्री केली आहे. औसा तालुक्यातील काही मोठ्या ग्रामपंचायती पैकी भादा हि एक मोठी ग्रामपंचायत असुन येथील निवडणुकीची गेल्या काही दिवसा पासुन सतत चर्चा होत. शेवटच्या क्षणा पर्यंत निकालाची गावक-यांना उत्सुकता होती. मात्र। आपल्या मतदानातून बालाजी शिंदेच्या विकास कामांना मतदारांनी पुन्हा एकदा वन्स मोर केले असुन त्यांच्या पँनलच्या पारड्यात तब्बल बारा सदस्याच्या विजयाची किमया केली आहे.

0 Comments