चाकुर तालुक्यातील ग्रामपंचायतीचा निकाल जाहिर;वडवळ(ना.)सत्तापरिर्वतन, नळेगावात अटीतटीच्या लढती
चाकूर:{सलीमभाई तांबोळी} चाकुर तालुक्यात 24 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आले होते.त्यात 2 ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या होत्या.22 ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झाले.चाकुर तालुक्यात 76.48% मतदारांनी मतदांनाचा हक्क बजावला. 18 जानेवारी रोजी सकाळी 10-00 वाजता तहसिल कार्यात मतमोजनीसाठी सुरुवात करण्यात आली.तहसिलदार तथा ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी डॉ.शिवानंद बिडवे यांनी 8 फेऱ्यामध्ये मतमोजनीची सुरु केली. ग्रापचायतीत अत्यंत आटीतटीची निवडणूक झाली.3,2,10,30,मतांनी उमेदवारांना पराभव स्विकारावा लागला. नळेगावत 70 उमेदवार रिंगणात होते. नळेगांवात रामराव बुदरे यांच्या पॕनलला 9 जागांवर विजय मिळाला. ग्रामीण भागातील मतदारांनी काट्यावरचे बहुमत दिल्याने उमेदवारांना निवडणूकीत दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करावी लागणार आहे. गावकारभारी साठी गावांतील लोकांनी मतदान करुन आपला गाव कारभारी निवडला. अनेक गावामध्ये चुरशीच्या लढती झाल्या मुख्य लढत नळेगांव,वडवळ ना. येथे झाल्या आहेत. नळेगांव पॕनल प्रमुखांना पराभव स्विकारावा लागला.वडवळ ना येथे अनेक वर्षापासून सत्ता परिवर्तन झाले नव्हते पण आज 50 वर्षानंतर सत्ता परिवर्तन झाले. आजच्या निकालामुळे कही खुभी तो कही गम नजर आराहा था शेळगांवामध्ये संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॕनलने बहुमत संपादन केले आहे. अजनसोंडा ग्रामपंचायतीमध्ये माजी जि.प.सदस्य हणमंतराव पाटील यांच्या पॕनलचा पराभव झाला. रोहीणा ग्रामपंचायतीत मछिद्र नागरगोजे यांच्या पॕनलला बहुमत मिळाले आहे.एकदरीत मातब्बर नेत्यांना कुठे पराभव तर कुठे विजय मिळाला आहे. विजयी उमेदवार नळेगाव ग्रामपंचायत जोगदंड शेषेराव गणपती,खांडेकर पद्मिमन रघुनाथ,मचकुरी अलिमुन चांद,चव्हाण सुर्यकांत नरसिंग,शिरुरे जनाबाई रामकृष्ण,सय्यद संजीदाबी शमीम,पांडे सतीश भगवान,सुरवशे जनाबाई रविंद्र,घोरवाडे ताजोद्दीन फत्तुसाब,तांदळे प्रतिभा नागभुषन,तोंडारे कलुबाई नागनाथ,मुजावर असफाक हशमअली,सावंत उमाकांत सुधाकर,गाडेकर कावेरी ज्ञानेश्वर,शिरुरे रवि शंकरराव,मुंजाने श्याम नारायण,सावळकर अनुसया विठोबा, वडवळ (ना) सोनकांबळे मुरलीधर किशन, शेख यास्मीन महेबुब,कोरे गणेश केशव,नवणे सागर संग्राम,कांबळे कल्पना पांडुरंग,सुर्यवंशी महादेव जगन्नाथ,गंदगे बालाजी बाबुराव,वाडकर अमित उमाकांत,स्वामी रेणुका गजानन,बगडे रोहिणी राजकुमार,कसबे हर्षवर्धन बाबुराव,बनवसकर संगीता रामलिंग,कसबे गंगुबाई गोपाळ,पटेल मुजीब जब्बार,गजाकोष पार्वती महादेव,सुर्यवंशी अनुसया महादेव,शेळगांव ग्रामपंचायत विजयी उमेदवार पाटील अनिल संग्राम,हिंगणे धनराज राम,शिंदे सिंधु सजंय,बोरुळवाड लक्ष्मण दिगांबर,माने शितल प्रशांत,चवळे रोहिणी रामदास,माने प्रभाकर झोटींगा,चापुले महानंदा सुभाष,पाटील नागिन दयानंद,रोहिणा केंद्रे गोपीनाथ राजाराम,सुर्यवंशी कोंडाबाई हरिबा,केंद्रे शोभाबाई पंडित,नागरगोजे मछ्चिंद्र व्यंकटराव,कांबळे आरती विलास,डिगोळे अश्विनी दत्ताञय,डोंगरे बालाजी नागनाथ, मुंडे हिराबाई आशोक
बाबलगाव ग्रामपंचायातीमध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये चिंचलवाड विठ्ठलराव रामराव,बजगिरे तानाजी प्रल्हाद यांना 93 समान मतदान पडल्यामुळे लहान मुलांच्या हाताने चिट्टी काढण्यात आली यामध्ये चिंचलवाड विठ्ठलराव रामराव याची चिट्टी निघाली.त्यांना विजय घोषित करण्यात आले.वडवळ ना येथील प्रभाग क्रमांक 2मध्ये काट्याची टक्कर झाली.विद्यामान उपसरपंच वैभव आण्णासाहेब पाटील यांचा केवळ 3 मतांनी पराभव झाला.नळेगांव ग्राम पंचायती मध्ये प्रभांग क्रमांक 5 मध्ये बागवान गौसोदीन खुदबोदीन व मुजावर असफाक हशमअली यांच्या चुरशीची लढत झाली.मुजावर असफाक हशमअली यांचा 10 मातांनी विजय झाला. नळेगावामध्ये माजी जि.प.सदस्य लातुर तथा पॕनल प्रमुख रामराव बुदरे यांचा आटीतटीच्या लढतीमध्ये निसटता पराभव झाला.गढ आल पण सिंह गेला अशी परिस्थिती नळेगांव मध्ये झाली आहे.
निवडून येणाऱ्या उमेदवारांना गुलाल व पुष्पगुछ घालुन त्यांचे स्वागत करण्यात आले.कार्यकर्तेनी विजयांचा जलोष फाटाके व पेडे वाटुन साजरा केला.संपुर्ण मतमोजनी शंततेत पार पडली.पोलीस निरीक्षक सोपन शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खंडु दर्शने,पोलीस उपनिरीक्षक निलम घोरपडे,चाकुर बिट अंमलदार रामचंद्र गुंडरे,चोख पोलीस बंदोबस्त लावला होता.



0 Comments