Latest News

6/recent/ticker-posts

येरोळ ग्रामपंचयतीवर भाजपाचे वर्चस्व

येरोळ ग्रामपंचयतीवर भाजपाचे वर्चस्व


13 पैकी भाजपाला 11 तर शिवसेनेचा 02 जागावर विजय

प्रशांत तांबोळकर

येरोळ:  येथील  ग्रामपंचायतीच्या  निवडणुकीत आज दि.18 जानेवारी रोजी झालेल्या मत मोजणीत भाजपाचे तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांच्या नेत्रत्वाखालिल कालिकादेवी ग्राम विकास पँनेलच्या माध्यमातुन 13 जागा पैकी 11 जागा जिंकत ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात घेतली. तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या येरोळ ग्रामपंचयतीच्या निवडणुकीत मंगेश पाटील व गोविंद पोतदार यांनी सुरवाती पासुन वर्चस्व राखत चार जागा बिनविरोध काढण्यात यश मिळवले होते. 13 पैकी 9 जागेवर निवडणुक झाली त्यात सात जागेवर विजय मिळवले मात्र वार्ड क्रमांक दोन वरील दोन्ही जागा शिवसेनेच्या नेत्या डाँ. शोभाताई बेंजरगे यांच्या गटाने जिंकत प्रथमच येरोळ ग्रामपंचायतीत प्रवेश मिळवला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी सरपंचानी निवडणुकीतुन पॅनेलच उभे केले नव्हते . त्यामुळे शिव सेनेच्या नेत्या शोभा बेंजरगे यांनी रविनाथ महाराज तांबोळकर यांच्या माध्यमातुन 13 पैकी नऊ जागा लढवत 2 जागेवर विजय मिळवला. विजयी ऊमेदवाराची गावातुन मिरवणुक काढुन मिठाईचे वाटप करण्यात आले.

Post a Comment

0 Comments