निलंगा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींपैकी 4 ग्रामपंचायत बिनविरोध निवडुन आल्या व 44 ग्रामपंचायतसाठी निवडणूकीची मतमोजणी निलंगा येथील उदगीर मोड जवळील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येते चोख बंदोबस्तात पार पडला. या निवडणुकीत अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. लातूर जि.प. माजी अध्यक्ष मिलिंद लातुरे यांच्या पत्नीला पराभव स्वीकारावा लागला. या निकालावरून संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे जरी वर्चस्व असले तरी दोन्ही बाजार समित्या कासार शिरशी, औराद शहाजनी, कासार बालकुंदा, हसोरी इत्यादी गावे त्यांच्या हातून गेल्याने सध्या भाजप कभी खुशी कभी गम या अवस्थेत आहे. मोठ्या ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
मतदारांच्या विश्वासास पात्र ठरा- अशोकराव निलंगेकर
निलंगा तालुक्यातील 48 ग्रामपंचायती पैकी 28 ग्रामपंचायतीवर काँग्रेसच्या विचारांचा पॅनल निवडून आला आहे आपल्याला गावच्या विकासासाठी जनतेनी निवडून दिल आहे त्यामुळे आपण गावच्या विकासाठी प्रयत्नशील राहावे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले यावेळी उपस्थित विजयकुमार पाटील , दयानंद चोपणे ,सुरेंद्र धुमाळ , लाला पटेल आदी जण उपस्थित होते.
गावाच्या विकासाठी सर्वांनी प्रयत्न करावे- आमदार संभाजीराव निलंगेकर
आता निवडणूक संपली राजकारण संपले आता सर्वांनी एकत्र राहून गावच्या विकासाठी प्रयत्नशील राहावे सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी एकत्र येहून एकजुटीने काम करावे असे मत माजी पालकमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केले.

0 Comments