Latest News

6/recent/ticker-posts

विशेष:चला अंधारातून.. प्रकाशा कडे... कुणाचेही गुपित उघडे करू नका

 चला अंधारातून.. प्रकाशा कडे...

कुणाचेही गुपित उघडे करू नका


का इजिप्शन इस्लामी विद्वानाने म्हटले आहे की, मला आयुष्यात एका स्त्री व्यतिरिक्त कुणीही ही निरुत्तर करू शकलेले नाही. त्याचं झालं असं की, एकदा एक महिला एका तबका मध्ये काही वस्तू ठेवून त्यावर सुंदर असा कपडा अच्छादून निघाली होती. मी तिला विचारले यात तबकात काय आहे? तेव्हा ती उत्तरली की, जर उघडे करायचे असते तर मी त्याला कापडाने झाकले असते का? झालं! मला तिच्या या  वाक्याने निरुत्तर करून टाकले व मला माझा अपमान झाल्यासारखेही वाटले. खरे पाहता तिचे हे वाक्य इतके अर्थपूर्ण आहे की त्यातून जीवनाचा एक महत्त्वपूर्ण सिद्धांत स्थापित होतो, तो म्हणजे कोणतीही गोष्ट लपवलेली असेल तर तिला उघडी करण्याचा प्रयत्न करू नये. कुणाचेही गुपित शोधण्याचा प्रयत्न करु नये, मग तुम्हाला विश्वास का असेना की त्याचे गुपित वाईट आहे. तुमच्यासाठी एवढे पुरेसे आहे की त्याने तुमचा सन्मान करत तुमच्या समोर आपली चांगली बाजू सादर केली आहे. यावरच तुम्हाला संतुष्ट व्हायला हवे. खरे पाहता आपल्या प्रत्येकाचा एक वाईट चेहरा असतो, इतका वाईट की तो आपण स्वतः पासूनही लपू इच्छितो. ईश्वराने आपल्या सर्वांच्या वाईट गोष्टीवर पर्दा  टाकलेला असतो. नाहीतर आपण एवढे अनैतिक कृत्य करत असतो की त्याची माहिती आपल्याला एकमेकांना झाली तर कदाचित आपण एकमेकांना मृत्यूनंतर दफन करणेसुद्धा पसंत करणार नाही. जेवढे गुन्हे आपण करतो त्यापेक्षा कितीतरी जास्त परदे ईश्वर त्याच्यावर टाकतो. म्हणून प्रयत्न या गोष्टीचा करत राहा की कोणाचेही गुपित माहीत जरी झाले तरी त्यावर चर्चा करून करू नये. समजा आपल्या चर्चा करण्यामुळे किंवा गुपित उघड करण्यामुळे त्या माणसाला अपमान सहन करावा लागला तर उद्या अंतिम हिशोबाच्या दिवशी जेव्हा ईश्वर विचारेल की मी  अमुक उपासकाची वाईट गोष्ट लपवून ठेवली होती ती तू का उघडी केलीस? तर विचार करा आपण काय उत्तर देऊ? एकमेकां च्या उणिवा शोधण्याची काही लोकांना सवयच असते. आदर्श समाज निर्मितीमध्ये ही सवय घातक आहे, म्हणून निश्चय करा की आदर्श भारतीय समाजाच्या निर्मितीसाठी आजपासून आपण कोणाचीही गुपित शोधणार नाही आणि आणि कोणाचे गुपित आपल्यासमोर उघड झाले तरी त्याची चर्चा दुसऱ्याकडे करणार नाही.

एम.आय.शेख {ज्येष्ठ पत्रकार}

Post a Comment

0 Comments