Latest News

6/recent/ticker-posts

हासोरी(बु) येथील नवनिर्वाचित विजयी उमेदवारांचा बसवराज पाटील मुरूमकर यांच्या हस्ते सत्कार

हासोरी(बु) येथील नवनिर्वाचित विजयी उमेदवारांचा बसवराज पाटील मुरूमकर यांच्या हस्ते सत्कार 


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा तालुक्यातील हासोरी (बु) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचा पॅनल विजयी झाला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी राज्यमंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित विजयी उमेदवांचा सत्कार करण्यात आला. काँग्रेसच्या पॅनलचे नेतृत्व प्रदीप नेलवाडे, सतीश बिराजदार, शंकर बरमदे, संजय आरीकर, तुकाराम बिराजदार ,रमेश आरीकर यांनी केले. विजयी उमेदवार किरण दिगंबर बरमदे, सचिन बाबुराव आरीकर, दयानंद व्यंकटराव शेंडगे, नितीन ज्ञानदेव सोनकांबळे, सौ.चंद्रशिला चंद्रकांत पाटील, सौ.अर्चना ज्ञानेश्वर पांढरे, सौ.विजयाबाई गुंडू बरमदे, सौ.कलावती कमलाकर कदम, सौ.अश्विनी ज्ञानेश्वर बिराजदार नवनिर्वाचित सदस्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील मुरूमकर यांची विठ्ठल साई साखर कारखाना मुरूम येथे भेट घेतली व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

Post a Comment

0 Comments