Latest News

6/recent/ticker-posts

निलंग्यात पुन्हा मानवतेचे दर्शन घडले;त्याच्यासाठी हिंदु हि रडले आण मुसलमानही रडले!

निलंग्यात पुन्हा मानवतेचे दर्शन घडले;त्याच्यासाठी हिंदु हि रडले आण मुसलमानही रडले!

  


शब्दांकन:बाबुराव आगलावे

 निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) लाख चाहे तिथे त्यांचा धर्म भिन्न होता, पण त्याच्यासाठी आश्रु एकच होते, कदाचीत अंत: करण ही वेगळी होती पण त्यावरील वेदना एकच होती. मन ही अनेक होती पण दु;ख एकच होते, पाउले अनेक होती पण वाट त्याच्यासाठी एकच होती...

 त्याच्यासाठी इथे हिंदु ही रडले अन मुसलमान ही रडले... निलंग्यात पुन्हा मानवतेचे दर्शन घडले.

निलंगा शहरातील शिवाजी नगर भागातील औसा लातूर रोडवर वानराला विद्युत शॉक लागून वानर जागीच मरण पावला सविस्तर माहिती अशी की, कच्ची फर्निचर चे मालक हाजी राजासाब कच्ची यांनी जाकीर जनहित सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जाकीर शेख यांना दूरध्वनीवरून वरील माहिती दिली. माहिती मिळताच तात्काळ जाकीर शेख व त्यांची पूर्ण टीम त्याठिकाणी पोहोचली असता वानर जागेवरच दुर्दैवी मृत्यू पावल्याचे आढळले व जाकीर शेख व त्यांची टीम त्याचा अंतिम संस्कार करण्यासाठी तयारी करत असताना समोरील एका झाडावर बसलेला वानर हे पाहून मोठ्या आवाजाने ओरडत होता. तो मुका जरी होता तरी त्याच्या समोर ज्यावेळेस हिंदु- मुस्लिम त्याच्या अंत्य विधिची तयारी करत होते तें्हा झाडावर बसुन त्याचाच मुका साथीदार खिन्न मनाने सतत ओरडत होता. ईश्वराने दु;ख व्यक्त करण्यासाठी जरी त्याला शब्द दिले नसले तरी  त्याच्या भावना माणसालाही रडण्यास भाग पाडत होत्या... तो असा ओरडत होता कि जणु आपल्याला सोडुन अचानक गेलेल्या साथीदाराला म्हणत असावा लोटके वापिस आ मेरे यार बीन तेरे जिंदगी अधुरी लगती है ! ... मानव असो कि मुका प्राणी ईश्वराने प्रत्येकाच्या काळजावर दु:खाचं ओझं ठेवलेलच आहे. शॉक लागून मृत्यू झालेल्या वानरावर नाईकवाडे यांच्या शेतात हिंदू-मुस्लिम तरुणांनी अंत्यविधी केले. निलंगा शहरात जाकीर सामाजिक संस्थेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे या संस्थेने शहरात सामाजिक सेवा करत आहेत बस स्टँडची स्वच्छता, मनोरुग्णाला अंघोळ घालणे, त्याला कपडे देणे व मागील काही दिवसांपासून या संस्थेने कपडा बँक चालू केली आहे या कार्याचा सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. यावेळी जाकीर शेख,माजी नगरसेवक अजित नाइकवाडे, महेश ढगे, राम लोंढे, राहुल पोतद्दार, अबू सय्यद, प्रताप हुरगुटे, किशोर हुरगुटे, राजू जाधव, करण नाईकवाडे आदी  सहकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments