महाराष्ट्राचा आरोग्यदायी चेहरा...
तब्बल दहा वर्षांनी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना भेटण्याचा योग आला..फोनवर शुभेच्छा,बोलणे व्हायचे..एकमत औरंगाबाद असताना जालना आवृत्तीसाठी राजेश भैय्यांचे हस्ते प्रकाशन केले होते आणि अंकुशराव टोपे साहेब असताना कारखान्याच्या बॉयलर अग्नी प्रदिपनाला विलासराव देशमुख यांना बोलावले होते..मीही त्या कार्यक्रमाला अंकुशनगर येथे गेलो होतो,तेव्हापासूनची मैत्री राजेश भैय्यानी जपली,कसलीही अपेक्षा न ठेवता हे विशेष..राजेश भैय्या तंत्रशिक्षण मंत्री असताना अनेक महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले,मात्र ते अकॅडमीकमध्ये जास्त रमले..एक नवा चेहरा तंत्रशिक्षणला देण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला..या मंत्रिमंडळात लोकनेते शरद पवार यांनी त्यांच्यावर आरोग्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली..कोरोनाच्या महामारित प्रत्येकाचे लक्ष महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यावर होते..जनतेच्या प्रत्येक कसोटीला हा आरोग्यमंत्री उतरला..केंरची मदत,महाराष्ट्राची ताकद घेवून एक नवा चेहरा महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाला दिला..दिवसरात्र कसलीही पर्वा न करता हा माणूस महाराष्ट्रभर फिरत राहिला..आईच्या मृत्यूचे दुःख कवटाळत न बसता त्यांनी तीन दिवसात सगळे विधी उरकून महाराष्ट्राला या जीवघेण्या आजारातून मुक्ती मिळवून देण्याचा प्रयत्न केला..आज मुंबईत मुद्दामहून भेट घेतली..मलबार हिलला बंगल्यावर गेलो..प्रचंड बिझी असूनही 'अरे कसे काय?असे म्हणत ' सगळी विचारणा केली.एकमतपासून ते रेडिओ मिरचीपर्यंतचा पट त्यांनी डोळ्यासमोर ठेवला..मी वर्षभर बिझी असतानाही तुमचे काय सुरू आहे,याची नोंद ठेवल्याची आठवणही करून दिली..राजेश भैय्यांच्या राजकीय कारकीर्दीचा आलेख उंचावत जातोय..अभ्यासू राजकारणी असल्याने,आलेल्या इंग्रजी,हिंदीतून सहजपणे पत्रकारांशी वार्तालाप करणाऱ्या या युवा नेत्याची पकड किती जबरदस्त आहे,हे पावलोपावली जाणवत होते.सोबतच सुरू असलेल्या लसीकरणाचे आकडे घेवून कुठल्याही अॅपमध्ये न अडकता मेन्युअली सगळे करून घ्या,महाराष्ट्र पाठीमागे राहता कामा नये अश्या सूचना सतत अधिकाऱ्यांना सुरू होत्या.हे सगळं महाराष्ट्रासाठी आश्वासक होत..सतत महाराष्ट्राच्या आरोग्याची काळजी घेणारा हा नेता कुठेही थकलेला दिसत नव्हता..मी खूप दिवसांनी भेटत होतो..इतक्या व्यापातूनही मैत्रीची विण घट्ट बांधून ठेवण्यात राजेश भैय्यानी दाखवलेली तत्परता मलाही अचंबित करणारी होती..प्रचंड उरक असलेला,मतदारसंघ आणि महाराष्ट्राच्या अनेक कामासाठी तत्पर असलेला,महाराष्ट्राचे आरोग्य सुदृढ राहावे म्हणून प्रयत्न करणारा हा नेता,उद्याचे एक चांगले भविष्य आहे यात शंका नाही..महाराष्ट्राचा चेहरा आरोग्यदायी रहावा म्हणून अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या या नेत्यास खूप खूप शुभेच्छा...
@ संजय जेवरीकर (ज्येष्ठ पत्रकार)

0 Comments