देवणी तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी अजित बेळकोने
देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) माजी मंत्री दिलीपराव देशमुख, लातुर जिल्हाचे पालकमंत्री अमित देशमुख, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर, जिल्हा अध्यक्ष श्रीशैल उटगे आणि मल्लिकार्जुन मानकरी सावकार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव प्रातांध्यक्ष बाळासाहेब थोरात साहेब यांच्याकडे पाठवण्यात आला होता. त्यास त्यांनी मंजुरी पत्र देऊन नुतन तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी अजित बेळकोने यांची निवड करण्यात आली.
निवड झाल्याबद्दल अजित बेळकोने यांनी मल्लिकार्जुन मानकरी सावकार यांना निवासस्थानी भेटुन आशिर्वाद घेतले आणि सावकारांच्या वतीने त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले. यावेळी सोबत माजी सरपंच काशीनाथ मानकरी सावकार, विजयकुमार मानकरी सावकार, सुभाष पाटील देवणीकर, अमित मानकरी, प्रताप कोयले, योगेश ढगे, राहुल बालुरे, तानाजी कांबळे, नामदेव मुराळे, शंकर पाटील अदिंची उपस्थिती होती.

0 Comments