स्व. देवेंद्र स्वामी(मठपती) यांच्या स्मरणार्थ तगरखेड्यात 'कन्यादान' योजना
कासार बालकुंदा:(प्रतिनिधी/मारुती लोहार) निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथिल दयानंद मठपती यांचा सामाजिक उपक्रम. मरता है शरीर,अमर है आत्मा - नेञदान से मिलता है स्वयं परमात्मा' हा आपल्या कृतीतून प्रेरणादायी संदेश देणारे स्व. देवेंद्र वैजनाथ स्वामी (मठपती) यांच्या स्मरणार्थ त्यांचे लहान बंधू विवेकानंद वैजनाथ मठपती (स्वामी) व दयानंद वैजनाथ मठपती (संचालक) यांच्यावतीने तगरखेडा ता.निलंगा जि.लातूर येथील सर्व जाती-धर्मातील विधवा महिलांच्या मुलीच्या लग्न कार्यासाठी यावर्षी ५००० रुपये 'कन्यादान राशी' देण्याचा निर्णय घेतलेला आहे.पुढील वर्षी ही राशी (रक्कम) वाढविण्यात येईल. कुटुंबकर्ता निघून गेल्यावर त्या कुटुंबाची काय अवस्था होते हे मठपती बंधूंनी अतिशय जवळून पाहिले आहे. याचीच जाणीव ठेवून 'विधवा महिलांच्या मुलीच्या लग्नासाठी' फुल नाही फुलाची पाकळी मदत व्हावी या उद्देशाने 'स्व. देवेंद्र स्वामी -कन्यादान योजना' राबवित असल्याचे मठपती बंधूंनी सांगितले. यावर्षी तगरखेडा गावात होणा-या २,४ विधवा महिलांच्या मुलींच्या लग्नाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे ही राशी नुतन सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक व प्रतिष्ठित नागरीकांच्या हस्ते वाटप केली जाणार आहे.

0 Comments