Latest News

6/recent/ticker-posts

चाकुर नगरपंचायत ताब्यात घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे धिरज पाटील यांचे संवाद बैठकीत आवाहन

चाकुर नगरपंचायत ताब्यात घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे धिरज पाटील यांचे संवाद बैठकीत आवाहन


स्वबळावर निवडणूक लढवावी बैठकीत कार्यकर्तेचा सुर

चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) चाकुर नगरपंचायत निवडणूकीसाठी आतापासुन तयारीला लागा. चाकुर नगरपंचायतीवर कॉग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी आतापासुन नियोजन करण्याचे आवाहन धिरज पाटील  जिल्हाध्यक्ष उस्मानाबाद तथा प्रदेश निरीक्षक चाकुर न.प.यांनी चाकुर येथे आयोजित संवाद बैठकीत केले आहे. यावेळी त्यांच्या सोबत अभय सांळुके नगरपंचायत निरीक्षक युवा नेते कॉग्रेस, ओमप्रकाश झुरुळे समन्वयक नगरपंचायत चाकुर, चंद्रकांत मद्दे, ॲड. हेमंतराव पाटील,  शिराजोद्दीन जहागीरदार, एकनाथ पाटील, रामराव बुदरे, सय्यद मुर्तुजाआली, मेयराजबी लखानगावे, केवळबाई मोठेराव, विकास महाजन आदि व्यपीठावर उपस्थित होते. आगामी कांही दिवसामध्ये नगरपंचायतीच्या निवडणूका पार पडणार आहेत. यामुळे चाकुर शहरातील कॉग्रेस कार्यकर्ते तसेच पदाधिकार्यानी नगरपंचायत निवडणूककीची तयारी करावी. जे इच्छुक उमेदवार आहेत. त्यांनी प्रत्येक वार्डात जाऊन मतदारांशी संपर्क साधावा. या नगरपंचायतीच्या निवडणूकीमध्ये कार्यकर्तेनी कॉग्रेस पक्षाचा झेंडा फडकवावा. नगरपंचायत निवडणूक कॉग्रेस पक्ष स्वबळावर लढण्याची तैयारी करणार आहे. तरी चाकुर शहरातील कार्यकर्तेनी तायारीला लागावे असे आहवान धिरज पाटील यांनी केले. चाकुर नगरपंचायात निवडणूक संदर्भात संवाद बैठकीचे आयोजन चाकुर शहरात करण्यात आले होते. कार्यक्रमांचे प्रस्ताविक विलासराव पाटील चाकुर तालुका अध्यक्ष यांनी केले. गेल्या निवडणूकीत आघाडी करुन कॉग्रेस पक्षाचे चार उमेदवार विजय झाले होते. तीन चार उमेदवारांचा निसटता पराभव झाला होता. शहरात कॉग्रेस पक्षाची मोठी ताकद आहे. कार्यकर्तेनी तन,मनाने काम केले तर नगरपंचायत कॉग्रेस ताब्यात येईल यात तिळमाञ शंका नाही. संवाद बैठकीमध्ये सय्यद मुर्तुजाअली,भागवत फुले, गंगाधर केराळे, सलीमभाई तांबोळी, साजिद लखनगावे, बाळु इरवाने आदिने निवडणूक स्वबळावर लढवावी असे मत व्यक्त केले.

याप्रसंगी अभय सांळुके यांनी आपल्या मनोगता मध्ये सांगितले की कॉग्रेस पक्षाला मजबुत करण्यासाठी कार्यकर्तेनी जोमाने कामाला लागावे व चाकुर नगारपंचायतीवर कॉग्रेस पक्षाचा झेंडा फडकावावा. कार्यकर्तेला पुर्ण ताकद दिली जाईल. जिल्ह्यातील सर्व संस्थेवर कॉग्रेसचा झेंडा फडकवने गरजेचे आहे. चाकुर नगरपंचायत मध्ये देखील कार्यकर्तेनी जास्ती जास्ता नगरसेवक निवडून येतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक उमेदवारांच्या पाठीमागे कॉग्रेस पक्ष भकमपणे उभे राहणार आहे.राज्यांचे वैद्यकीय शिक्षण मंञी,पालकमंञी अमित विलासराव देशमुख यांचे हात बळकट करण्यासाठी चाकुर नगरपंचायतीवर कॉग्रेसचा झेडा फडकविण्यासाठी कामाला लागावे. कार्यकर्तेच्या ज्या तीव्र भावना आहेत.त्या भावना नेत्यापर्यत त्याच्या पेक्षा जास्त भावनेने पोहोचवणार अशी गवाही दिली. 

या संवाद बैठकीला संतोष पाटील, अॕन्ड, कोरे, सुरेश मुंढे, गंगाधर केराळे, सिताराम मोठेराव, आनंद झांबरे, भागवत फुले, निलेश देशमुख, साजीद लखनगावे, रियाज पठाण, पौळकर धोडीराम, सुनिल शिंदे, बाळु इरवाने, विजय धनेश्वर या कार्यक्रमाचे सुञसंचलन व आभार सलीमभाई तांबोळी मिडीया प्रमुख यांनी मानले.

Post a Comment

0 Comments