डॉक्टर नागेश पाटील यांचा सत्कार
कासार बालकुंदा:( प्रतिनिधी/मारुती लोहार) निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथील डॉ. नागेश पाटील यांचा जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कासार बालकुंदा येथील नागेश पाटील यांनी पीएचडी प्राप्त केली आहे. ते सध्या जिल्हा परिषद प्रशाला, भादा येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. यावेळी पतसंस्थेचे अरुण सोळुंके, शिक्षक समितीचे नेते, बालाजी येळीकर, शिक्षक पतसंस्थेचे संचालक शी के पाटील, धनाजी आर बी, पिटले पी बी, सचिन चौधरी, औटे आदी उपस्थित होते.

0 Comments