Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा युथ तर्फ विविध मागण्यांसाठी न.प.समोर धरणे आंदोलन सुरू

निलंगा युथ तर्फ विविध मागण्यांसाठी न.प.समोर धरणे आंदोलन सुरू


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा शहरातील विविध मागण्या संदर्भात निलंगा युथ तर्फ नगर परिषद, निलंगा समोर धरणे आंदोलन आजपासून सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला विविध पक्ष, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाठींबा दर्शविला आहे.

निलंगा शहरातील अनेक वर्षे झाले नगर पालिकेच्या दुकानांचे फेर लिलाव वर्षनुवर्षं झाले नाहीत अथवा ज्यांच्या नावावर दुकाने आहेत त्यांनीच व्यापार करावा पोट भाडेकरू म्हणून इतरांना चडे भाडे दराने दुकाने देऊ नये असा नियम लावण्यात यावा व स्वतःच्या नावे दुकान घेऊन इतरांना दुप्पट चौपट भाडे तत्वावर दुकाने देणाऱ्यावर त्वरित कठोर कार्यवाही करून दुकानांचे फेर लिलाव करण्यात यावे. व शहरातील निलकंठेश्वर मार्केट यार्ड येथील नवीन इमारत  मधील दुकानाचे लिलाव करण्यात यावे. व निलकंठेश्वर मार्केट यार्ड येथील लाकडी मशीन मालकांनी सार्वजनिक 60 फुटी रस्त्यावर केलेला अतिक्रमण त्वरित काढून आज रोजी पर्यंत अतिक्रमण केलेला दंड आकारून रस्ता मोकळा करण्यात यावा व यांच्या कडून दंड आकारण्यात यावा. निलंगा नगर पालिकेच्या दुकानांना कमाल व किमान भाडे निश्चित करण्यात यावे अश्या मागण्या घेहून निलंगा युथ तर्फ नगर परिषदेच्या समोर धरणे आंदोलन चालू आहे. 

Post a Comment

0 Comments