Latest News

6/recent/ticker-posts

प्रेस संपादक,पत्रकार संघाच्या औसा तालुका अध्यक्षपदी बालाजी उबाळे

प्रेस संपादक,पत्रकार संघाच्या औसा तालुका अध्यक्षपदी बालाजी उबाळे


लातूर:(जिल्हा प्रतिनिधी/बी जी शेख)दि.२३ - प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.आंबेगावे डी टी यांच्या अध्यक्षतेखाली लातूर येथील डी पि डी सी हॉल. प्रशासकीय इमारत येथे शुक्रवार दि 22 जानेवारी 2021 रोजी आयोजित कोविड-19 योद्धा सन्मान समारंभानंतर  घेण्यात आला.यानंतर संघटनेच्या बैठकीमध्ये लातूर जिल्हा अध्यक्ष यांच्या आदेशाने औसा तालुका प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या औसा तालुका अध्यक्ष पदी बालाजी उबाळे यांची निवड करण्यात आली. यावेळी संघटनेचे राज्य पदधिकारी उपस्थिती होते. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य लातूर यावेळी विविध क्षेत्रातील तीस कोविड योद्धांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के तर जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज व पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी शुभेच्छा दिल्या. व्यासपीठावर  कार्यक्रमाचे अध्यक्षस्थांनी संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, राज्य महिलाध्यक्षा डाॅ. सुधाताई कांबळे, राज्य उपाध्यक्ष व्यंकटराव पनाळे, अजय सुर्यवंशी, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर, लातूर जिल्हाध्यक्ष लहू शिंदे, जिल्हा महिलाध्यक्षा वैशाली पाटील, जिल्हा संघटक संजय राजुळे, जिल्हा संपर्क प्रमुख नितीन भाले, जिल्हा समन्वयक सुनिल बरूरे, जिल्हा महिला संघटक छाया गुणाले, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनटक्के आदी मान्यवर उपस्थित होते. कोविड काळात आपल्या जीवाची पर्वा न करता समाज, राज्य व देशासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल डाॅ.प्रमोद घुगे, डाॅ. शितल पाटील, डाॅ.सुनिल होळीकर, डाॅ.पवन लड्डा, डाॅ.अजय अजनीकर, डाॅ.शिवशंकर नागापुरे, डाॅ.आशिष चलवदे, डाॅ.पुंडलिक सुडे, डाॅ.चाँद पटेल, डाॅ. चंद्रकांत चाटे, डाॅ. सचिन सगर, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कांबळे, दिलीप आगळे, कृष्णा जोशी, सिध्दाजी मोरे,बी जी शेख जिल्हा प्रतिनिधी मराठी अस्मितेचा इशारा  हे ही होते. तसेच सर्व तालुक्याचे पदाधिकारी  व पत्रकार बांधव मोठ्या उपस्थिती होते निवेदन संपादक सुर्यवंशी,कदम व शिवाजी गायकवाड यांनी तर आभार नितीन भाले यांनी मानले. नवनियुक्त पदाधिकारी सदस्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत कार्य कार्यकारिणीचे स्वागत केले.

Post a Comment

0 Comments