Latest News

6/recent/ticker-posts

मुख्यकार्यकारी यांच्या आदेशाने अंतर्गत मूल्यांकनासाठी अंगणवाडी साहित्य वाटप

मुख्यकार्यकारी यांच्या आदेशाने अंतर्गत मूल्यांकनासाठी अंगणवाडी साहित्य वाटप 


अंतर्गत रूप बदलले परंतु भादा सह औसा तालुक्यातील अनेक अंगणवाडी इमारतिना संवरक्षक भिंत नसल्याने असभ्य नागरीक घाण टाकणे, कचरा,पशु,जनावरे बांधणे,परीसर घाण करणे यामुळे शाळेचे पावित्र्य धोक्यात आलेचे जाणवत असल्याच्या प्रतिक्रिया दक्ष आणि शिक्षण प्रेमी नागरीक देत आहेत.

औसा:(तालुका प्रतिनिधी बी डी उबाळे) दि.२३ - लातूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सी ओ) अभिनव गोयल यांच्या आदेशाने 15 वा वित्त आयोग निधी 2020-21 अंतर्गत अंगणवाडी मूल्यांकनासाठी लागणारे आवश्यक साहित्य यांचे वाटप करण्यात आले. औसा तालुक्यातील भादा येथील प्रशासक जयंत जाधव ग्रामविकास अधिकारी माणिक सूर्यवंशी अधिकारी माणिक सूर्यवंशी यांनी शनिवार दिनांक 23 जानेवारी 2021रोजी गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ, विस्ताराधिकारी बालाजी पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली भांदयातील सर्व अंगणवाड्यांना साहित्य वाटप करण्यात आले. या साहित्यामध्ये घसरगुंडी ,सायकल ,कचराकुंडी, झोका ,विद्यार्थी ओळखपत्र ,बॉल ,डोमिनोज ,घोडा आदींचे वाटप करण्यात आले. यावेळी सर्व ग्राम पंचायत कर्मचारी यामध्ये नंदकुमार फरताळे,शिवाजी बनसोडे,ब्राह्मनंद स्वामी,लखन लतूरे यांनी सहकार्य केल्याने सर्व आठ अंगणवाडीना साहित्य वाटप करण्यात आले.

Post a Comment

0 Comments