Latest News

6/recent/ticker-posts

लाॅकडाऊन काळातील वीजबिल थकबाकीदारांचे कनेक्शन न तोडता,कडक वसुली थांबविण्याची मागणी

लाॅकडाऊन काळातील वीजबिल थकबाकीदारांचे कनेक्शन न तोडता,कडक वसुली थांबविण्याची मागणी


औसा:(तालुका प्रतिनिधी/बी डी उबाळे)दि.२३ - एमआयएमच्या वतीने राज्यातील सर्वसामान्य जनतेचे लॉकडाउन काळातील वीजबिल कमी करावे व थकबाकीदारांचे कनेक्शन न तोडता आणि कडक वसुली थांबवावी असे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दि. 21 जानेवारी 202 रोजी औसा तहसीलदारांमार्फत निवेदन सादर करण्यात आले आहे. याबाबत माहिती की, राज्यात 17 मार्च 2000 पासून कोव्हिड -19 च्या कोरोना विषाणूंच्या संसर्ग महामारी मुळे राज्यात सर्वत्र लॉकडाऊन होते या काळातील सर्व उद्योग, व्यवसाय बंद होते. सर्वत्र लॉकडाऊन, संचारबंदी परिस्थिती असताना सर्व व्यवहार बंद होते. यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला, सर्व सामान्यांची आर्थिक घडी विस्कळीत झाली. परिणामी संसाराचा गाडा चालवणे मुश्किलचे झाले. आता परिस्थिती पुर्व पदावर हळूहळू येत आहे. त्यातच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे (महावितरण) अधिकारी भरमसाठ आकारलेल्या वीज ग्राहकांचे लाईट बील माफ करण्या ऐवजी लाईट कनेक्शन कट बंद करण्याची मोहीम हाती घेत सर्व सामान्य जनता व नागरिकांना हाल करत आहेत. महावितरण कंपनीने लाईट बील विज ग्राहकांचे माफ करून लाईट कनेक्शन तोडण्याची मोहीम थांबविण्यात यावी अन्यथा औसा एमआयएमच्या वतीने संविधानिक मार्गाने जनआंदोलन करण्यात येईल असे औसा एमआयएम चे सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी औसा तहसीलदारांमार्फत मा. मुख्यमंत्रीना निवेदन सादर केले आहे या निवेदनावर अॅड. गफरुल्ला हाश्मी, सय्यद मुजफ्फर अली इनामदार, ईलहाज पटेल, सतीश गायकवाड, अजीज पटेल, अक्षय बनसोडे, बापू होळकर, सय्यद फजले रहीम, शेख आफताब, शेख नाजम यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments