Latest News

6/recent/ticker-posts

झरी च्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही आ बाबासाहेब पाटील यांची ग्वाही

झरी च्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही आ बाबासाहेब पाटील यांची ग्वाही


चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) झरी सह आजूबाजूच्या परिसरात विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन चाकूर अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी येथे आयोजित कार्यक्रमात केले. चाकूर तालुक्यातील झरी येथे दहा लक्ष रुपयाच्या विकास कामांचा भुमिपुजन चाकूर अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच दयानंद सुरवसे होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून शिवाजीराव काळे, पद्माकर पाटील, बालाजी सूर्यवंशी, तुकाराम पाटील, गणपत कवठे, बालाजी मेंनचक्रे, बाळासाहेब पाटील, व्यंकटराव जांभळदरे, सचिन तोरे, समाधान जाधव, राहूल सुरवसे, विवेक शिंदे, बिलाल पठाण, युवराज काका सूर्यवंशी पाटील, राम सारोळे, नितीन पाटील, माधव वाकळे, ज्ञानोबा जाधव, मुनीरजी पटेल, प्रकाश कामाळे, लालासाहेब शिंदे, तुकाराम केंद्रे लक्ष्मणराव पस्तापुरे, विश्वंभर पाटील, धनराज सुर्यवंशी, विठ्ठल उदगिरे, पांडुरंग धडे, बाळू कासले, , सुनील सूर्यवंशी, माधव पुणे, वैश्यपान करडीले, सुधिर सोनवणे, सत्यवान होळे सह आदी उपस्थित होते. झरी येथील डॉ. शुभांगी धायगुडे, एम डी रणदिवे, शेख एस जी, सिंदाळकर मॅडम, अनुराधा खलंग्रे यांच्या सह अंगणवाडी कार्यकर्ती व आशा कार्यकर्ती यांचा कोरोणाच्या काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच जानवळ जिल्हा परिषद मतदार संघातील महाळंगी हाडोळी, झरी खुर्द या ठिकाणच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सुद्धा आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. झरीचे माजी सरपंच दयानंद सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून झरी बुद्रुक, झरी खुर्द ,जानवळ हाडोळी, हनमंत जवळगा, हिंपळनेर ,रोहिना येथील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला या सर्व नूतन कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा चाकुर अहमदपुर विधानसभा मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी स्वागत केले व पक्षवाढीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी मेनचक्रे यांनी सादर केले, अध्यक्षीय समारोप माजी सरपंच दयानंद सुरवसे यांनी केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश स्वामी व जयेश कर्डिले यांनी केले व आभार गणेश डोंगरे यांनी मानले. कार्यक्रमास झरी व परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments