भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संवाद बैठाकीस उपस्थित राहण्याचे आहवान
चाकुर नगरपंयात निवडणूक 2021 आढावा बैठक
चाकुर:(ता.प्र.सलीमभाई तांबोळी) आगामी होऊ घातलेल्या चाकुर नगरपंचायत निवडणूक संदर्भात चाकुर शहरात संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीस कॉग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते यांना उपस्थित हारण्यांचे आहवान विलासराव पाटील चाकुर तालुका अध्यक्ष यांनी केले आहे. चाकुर नगरपंचायत हद्दीतील चाकूर,सरणवाडी व माहुरवाडी येथील सर्व काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, माजी ग्राम पंचायत सदस्य, पक्षाचे विविध संघटनेतील आणि संस्थेवरील आजी- माजी पदाधिकारी कार्यकर्ते आणि ईच्छुक उमेदवार यांना विनंती करण्यात येते की उद्या रविवार दिनांक 24 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता आगामी नगरपंचायत चाकूर निवडणुकी संदर्भात खालील मान्यवरांच्या उपस्थितीत "काॅग्रेस कार्यालय" विलासराव पाटील काॅम्पलेक्स, चाकूर या ठिकाणी संवाद बैठक आयोजित करण्यात आली आहे. संवाद बैठकीस प्रमुख उपस्थिती शैलैश पाटील चाकूरकर (सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मुंबई)धिरज पाटील जिल्हाध्यक्ष, उस्मानाबाद काँग्रेस कमिटी तथा प्रदेश निरीक्षक चाकूर आणि शिरूर अनंतपाळ प्रमुख उपस्थिती. नगरपंचायत निरीक्षक अभय साळुंके नगरपंचायत समन्वयक ओमप्रकाश झुरुळे उपस्थित राहणार आहेत. तरी चाकुर शहरातील कॉग्रेसच्या सर्व सेलच्या पदअधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहण्यांचे आहवान विलासराव पाटील चाकुरकर यांनीी केले.

0 Comments