मूक बधिर विद्यार्थी कृष्णा काळे यांचे शिक्षणाचा खर्च आक्का फाउंडेशन तर्फ
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) तालुक्यातील धानोरा येथील रहिवासी कृष्णा बब्रुवान काळे हा मूक बधिर विद्यार्थी घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे पुढील शिक्षणासाठी अडथळा येत असताना मला पुढील शिक्षण घ्यायचे आहे असे मत भाजपा चे जेष्ठ कार्यकर्ते किशोर जाधव यांच्याकडे मांडले. लागलीच किशोर जाधव यांनी 26 जानेवारी रोजी कृष्णाला घेऊन जनसंपर्क कार्यालय निलंगा येथे लातूरचे माजी पालकमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांची भेट घेतली. किशोर जाधव यांनी कृष्णा काळे याची असलेली शिक्षणा बद्दलची आवड आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांना सांगितली. मुलाची जिद्द आणि शिक्षणा बद्दलची आवड पाहून त्याचे पूर्ण शैक्षणिक खर्च आणि लातूर येथे राहण्याची सोय आक्का फाउंडेशन तर्फे करण्यात येईल असे आ.संभाजीराव पाटील यांनी आश्वासन दिले होते. आज शुक्रवारी किशोर जाधव यांच्या उपस्थित लातूर येथे आक्का फाऊंडेशन तर्फे कृष्णा काळे यांचे प्रवेश झाले सोबतच त्याची राहण्याची सोय करण्यात आली. धानोरा गावातून किशोर जाधव यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. यावेळी उपस्थित रवी असोपा, भाजपा जिल्हा युवा मोर्चा संघटन सरचिटणीस तानाजी बिराजदार, भालचंद्र ब्लड बँक लातूर चे जनसंपर्क अधिकारी पवार, महादेव म्हेकरे, कृष्णा यांचे वडील बब्रूवान काळे व शाळेचे मुख्याध्यापक शर्मा सर आदी जण उपस्थित होते.

0 Comments